प्रश्न तयांचे

प्रश्न तयांचे पेटत ठेवा
जनता अवघी झुलवत ठेवा

सांगा त्यांना स्वतंत्र आपण
मात्र तयांवर पाळत ठेवा

रामाची तर भाषा बोला
रामपुरी पण सोबत ठेवा

संध्याकाळी न चुकता या
मयखान्याची इज्जत ठेवा

नेकी कर के डाल कुंए मे
ही कामाची पद्धत ठेवा. 


Comments