Posts

तिफण

लोक काय म्हणतील ते म्हणू देत तुझ्या माझ्या प्रेमाचा एवढाच हेतू काळोखाच्या मधोमध उजेडाचा सेतू देवळात पडतो उजेड भक्त ठेवता पाय तेथे अन्यथा काय असते तेथे अनेक भाषिक कवयित्री व्यासपीठावर  आपापल्या भाषेत कविता वाचत होत्या आणि…एकाच भाषेत हसत रडत होत्या

तिफण

चाले गोड आमुचा प्रपंच तिच्या कपाळावर सारखी आठी नि माझी भुवई उंच जमणार नाही तुझं माझं कारण आहे ठोस उन्हाशिवाय चालत नाही मला अन् तुला चंद्रकिरणांचा सोस उडण्याऐवजी वरवर राजकारणी  खालीखालीच घसरू लागली अन् पंखाऐवजी पदरच पसरू लागली

तिफण

कवितेवरच असं किती दिवस जागायचं ठरवून टाकलंय मी आता फक्त तिच्यावरच मरायचं बागेमधली फुलं सारी चाचत होती धुंदीत मी एकटाच तिथे शुध्दीत पत्र हे सर्वांना खुले हिरव्या झाडांना कशी येतात केशरी रंगांची फुले

अचानक

खूप वर्षांनी ती अचानक माझ्यासमोर मग.. ती पहिली भेट पहिला स्पर्श प्रेमपत्रांचा सिलसिला जागेपणी झोपेमधे स्वप्न पाहण्याचा छंद अशा सर्व जुन्या आठवणींचा आसमंतात पसरला गंध……..

लोक लज्जा

रडूही नाही शकत मी  घळाघळा लोकांसमोर, प्यावे लागतात मला माझेच अश्रू अविरत लोकलज्जेखातर आणि… शारीरातील मिठाचं प्रमाण  वाढत चाललंय दिवसेंदिवस बिच्चारे डॉक्टर म्हणतात "रक्तदाब वाढत चाललाय तुमचा पापड लोणचं बंद करा"..

मैफल

तीक्ष्ण स्मरणशक्तीचा माणूस ही बिरुदावली घेऊन मिरवत राहिलो मी जन्मभर मानासन्मानाने पण… पश्र्चिम किनाऱ्यावर येता येता काहीच आठवत नव्हतं मला गतकाळातलं प्रेमाच्या दोन चार तेजःपुंज ठिपक्यांशिवाय एवढा मानसन्मान पुरेसा आहे मला संध्याकाळच्या मैफलीसाठी

अपघात

ताठ मानेने जगा असं बाळकडू लहानपणीच मिळालंय मला आणि… जगण्याच्या प्रत्येक पायरीवर जगलोयही मी अगदी तसंच पण.. एका अवघड व बेसावध वळणावर झालाच तो अपघात तिच्या प्रेमाची ती अनोखी अदा बघून झुकावंच लागलं मला तिच्या समोर……..