तिफण
लोक काय म्हणतील ते म्हणू देत तुझ्या माझ्या प्रेमाचा एवढाच हेतू काळोखाच्या मधोमध उजेडाचा सेतू देवळात पडतो उजेड भक्त ठेवता पाय तेथे अन्यथा काय असते तेथे अनेक भाषिक कवयित्री व्यासपीठावर आपापल्या भाषेत कविता वाचत होत्या आणि…एकाच भाषेत हसत रडत होत्या