हातखंडा
माझा एक मित्र खूपच हुशार
अंगापिंडाने अगदीच आडदांड
मला तो नेहमीच भीती घालायचा
मारण्यासाठी सारखा मागे धावायचा
एके दिवशी मी केला मनाचा हिय्या
धावायची दिशाच बदलली, अन्
त्याच्या रोखानेच धावू लागलो
आणि….. आश्चर्यम्
माझा हा रुद्रावतार बघून
तोच उलट्या दिशेने धावू लागला
आता मी मागे तो पुढे
आणि त्याची शेवटची चलाखी अशी की
जगाला सांगत सुटला
धावण्यात माझाच हातखंडा ….
Comments
Post a Comment