मीच वेद अन्
हात सखीचे रेशिम रेशिम
जीवनभरची जोखिम जोखिम
गोड गोड त्या अधरावरचे
वीष प्यायलो जालिम जालिम
प्रेम गरज ही नसो कुणाची
मजसाठी ती लाजि़म लाजि़म
पुन्हा पुन्हा घ्या चषक मधुचा
म्हणू नका हा अंतिम अंतिम
तिची आसवे माझे खांदे
श्रावणातली रिमझिम रिमझिम
कविता गझला गीत रुबाया
रोज चालते तालिम तालिम
मीच वेद अन पुराणही मी
इतका आहे आदिम आदिम
भूप संपला अता भैरवी
पूर्व संपता पश्चिम पश्चिम
Comments
Post a Comment