मिश्र गझल



नसे शस्त्र हाती... मुझे मार डाला
असे तंत्र न्यारे... शिकारी निराला

मला आवडे ती तिला आवडे मी
मधे आडवा हा...खडा जातवाला

दिले ग्रंथ हाती दिली धर्म दीक्षा
जवानीत माझा... जनाजा निकाला

कुठे काळजाने जरा पेट घेता
क्षणार्धात तेव्हा... हुआ जो उजाला

उभ्या जीवनी ह्या...तिचा हात सारा
तिने प्रेम केले...उसीने संभाला

तिन्ही लोक माझे नवा मी प्रवासी
जिथे बैसतो मी... वही मद्यशाला


Comments