केले
काम हे दिनरात केले
दु:ख मी आयात केले
वेदनेचे काम मोठे
मज तिने प्रख्यात केले
खेचली गर्दी सभोती
काम मी मसणात केले
मी करीयर वेगळे अन
नेमके मद्यात केले
हे अनोखे पर्यटन मी
मंदिरी दर्ग्यात केले
मी नवा बिल्डर जहालो
घर तिच्या ह्रदयात केले
हार होती पण रुपांतर
मी तिचे विजयात केले..
कोणत्या धर्मात नाही
बदल मी माझ्यात केले
Comments
Post a Comment