कधी....


कधी इर्शाद मज नाही
कुणाची दाद मज नाही

कटी नाजूक असणारी
सखी शम्शाद मज नाही……..

स्मृती माझी जरी तल्लख
सुखाची याद मज नाही..
               
तुला केले गुलाबाने
तसे आल्हाद मज नाही

तसा आहे जुगारी मी
तरी तो नाद मज नाही

स्मृती माझी जरी तल्लख
सुखाची याद मज नाही……...

बघा हा अंगठा शिल्लक
कुणी उस्ताद मज नाही…….


Comments