पडछाया…
मृगनयनी मनमोहनी
चंद्रमुखी गौरवर्णी
शेंग चवळी चाफेकळी
सिंहकटी गजगामिनी….
माझ्या कवितेतील
हे शब्द म्हणजे
तुझी पडछायाच जणू……..
वरना…..!
कागद पेन यह सब छोडके
टचस्क्रिनवरच टायपून टाकली
एक झक्कास पोईट्री कटेंपररी जुबां मे
आणि तीही
स्टाईलीश फाँटस और अच्छे ईमोजी सह
तुरंत शेअरही केली सोशल मीडिया पे
ती नज्म़ माझ्या मोबाईल मधून
क्षणार्धात व्हायरल हो गयी वर्ल्ड मे
और हे कित्ती नाईस
काही मिंटात सेकडो लाईक्स आणि
कमेंट्स की बौछार झाली
फेसबुक पे फ्रेंडशिपची रिक्वेस्टी वर रिक्वेस्टी पडल्या
कब मिलेंगे असा व्हाट्सअप वर पैगाम आला
एकानी तर रिक्वेस्ट फर्मायी
फ्रेंच जर्मन इटालियन भाषेत
ट्रांसलेशनच्या परमिशन ची
संग्रह निकालेंगे क्या….एका उर्दू प्रकाशकाची ऑफर
एका इसमाचा फोनही आया
आबे डिलीट मार ती कविता
शुद्ध लिही प्रमाण भाषेत लिही
वर्ना… यू नो
Comments
Post a Comment