स्पर्श तू



स्पर्श तू काळीज हे अलगद पुन्हा
अन पडू दे चांदणे शारद पुन्हा

आसमंती गंध ज्याचा दरवळे
ते गुलाबी धाड मज कागद पुन्हा

तुज मुळे प्रियकर उपाधी मज पडे
प्रेयसी हे लाभले तुज पद पुन्हा

प्रेम शांती घेवुनीया शस्त्र तू
वासनेचे ठार कर श्वापद पुन्हा

ये समोरी दे आलिंगन साजणी
आज कर ह्रदयास ह्या गदगद पुन्हा

मी तुझ्या प्रेमात ऐसा संपलो
अन तुला दिसणार ना शायद पुन्हा..

देश नाही धर्म नाही देह ही
नेमक्या क्षितिजास कर सरहद पुन्हा


Comments