उजेडाचे नाव घेता
सदा तर करतात गोष्टी शहाण्यांच्या
नका हो वाटेस जावू पिणाऱ्यांच्या
बघा ती कफनी खडावा तिलक दाढी
जगी ह्या फिरतात जाती भगोड्यांच्या
उजेडाचे नाव घेता बिथरती अन
कपाळावर घाम येतो कितेकांच्या
खळी गालांवर सदा अन कमर पतली
सदा मज दिसतात झुंडी शिकाऱ्यांच्या
जरी झालो मी सरेंडर सखेपुढती
तरी पण रागेंत बसलो विजेत्यांच्या
कुणा लटकी घ्यायची रोज फाशी जर
हरभऱ्याचे झाड कर मग जवळ त्यांच्या
कुणी नाही भीक घालत भुतांना मग
तसे पाठी लागती ते भिणाऱ्यांच्या
....डॉ नरसिंग इंगळे
Comments
Post a Comment