तुझी संस्कृती
वेळ नेमकी आहे कातर
चल येवू या अता समेवर
हाच कायदा प्रेमामध्ये
चुकले माझे तुझे बरोबर
होणार कधी रे बाळ तिला
तुझी संस्कृती सदा गरोदर
चषक लाव तू ओठांना रे
होण्याआधी तुझे कलेवर
भूक लागते साऱ्यांना पण
कुठे पेटती चुली घरोघर
कसा मला पावेल देव रे
तुझी नोट नि माझी चिल्लर
Comments
Post a Comment