हझल


अता आपुली मर्जी सोडा
बुडाखालची खुर्ची सोडा…….

डाग तयावर दिसतो मग ती
खाकी खादी वर्दी सोडा……..

तोट्यातच का बजेट जातो
कधीतरी तो शिलकी सोडा……..

सत्तेवर जे टीका करती
त्यांच्यामागे ईडी सोडा……..

अशी प्रतीष्ठा वाढत जाते
हतात चकणा व्हिस्की सोडा……

चिरीमिरी द्या बाबूला अन
लाल फितीची नस्ती सोडा…….

बघा गटारी येते आहे
माहेरी मग पत्नी सोडा…….

तुम्हास शांती नकोस तर मग.
मंदिरावरी मशिदी सोडा……..

धर्म चिकित्सा करतो त्यावर
पुराणातली वांगी सोडा………

Comments