काफियाबंद गझल
संशयाने घात केला ऐनवेळी
मीपणाने घात केला ऐनवेळी
ना कधी जोपासली मी अंधश्रद्धा
मांजराने घात केला ऐनवेळी
मी मला मानून होतो राजबिंडा
आरशाने घात केला ऐनवेळी
पाहता ती आसवें दाटून आली
पावसाने घात केला ऐनवेळी
देव होता बाप साऱ्या मानवाचा
माकडाने घात केला ऐनवेळी
Comments
Post a Comment