काफियाबंद गझल
खिशास आहे बघा केवढी
मिजास आहे बघा केवढी
तशी बोलण्या अमाप संधी
मुक्यास आहे बघा केवढी
बरीच जागा दु:ख व्यापते
सुखास आहे बघा केवढी
समाज देतो तर तरी प्रतिष्ठा
पिण्यास आहे बघा केवढी
वस्त्र फाटता भाव मिळेना
नव्यास आहे बघा केवढी
जिच्यावरी तो...जरी बेगडी
मिरास आहे बघा केवढी
Comments
Post a Comment