लोक लज्जा

रडूही नाही शकत मी 
घळाघळा लोकांसमोर,
प्यावे लागतात मला
माझेच अश्रू अविरत लोकलज्जेखातर
आणि…
शारीरातील मिठाचं प्रमाण 
वाढत चाललंय दिवसेंदिवस
बिच्चारे डॉक्टर म्हणतात
"रक्तदाब वाढत चाललाय तुमचा
पापड लोणचं बंद करा"..



Comments