अपेक्षा

कोवळी उन्हं उतरली कि…
रणरण व्हायला सुरुवात होते आयुष्याची
चटके बसतात घाम जातो थकवा येतो
पण.. तारुण्याच्या उफाड्यात
निभावून नेतो मी हे सगळं,
अगदी सहजपणे..
आणि...माझी मानसिक तयारीही पूर्ण झालेली असते
येणाऱ्या रातीला उपसून काढण्याची 
पण...माझी संध्याकाळ मात्र
रंगीबेरंगी व्हावी मित्रांसोबत
बस्…
एवढीच अपेक्षा.


Comments