काफियाबंद गझल

गझले तुझ्यामुळे मी
जगले तुझ्यामुळे मी

ह्रदयात आग होती
विझले तुझ्यामुळे मी

स्वप्नात साजणा रे
हसले तुझ्यामुळे मी

आभार वेदने गं
रमले तुझ्यामुळे मी

माझे न शब्द काही
लिहिले तुझ्यामुळे मी

ऐकून आरशा घे
कळले तुझ्यामुळे मी

अज्ञान खूप माझे
शिकले तुझ्यामुळे मी

समजू नकोच वाऱ्या
विझले तुझ्यामुळे मी.

ऐकून घे यमा रे
सुटले तुझ्यामुळे मी. 

Comments