काफियाबंद गझल
असे कसे मी विसरुन जावू
खरे कसे मी विसरून जावू
अजरामर जे जगात झाले
खिळे कसे मी विसरून जावू
तूच दिलेले काळजातले
तडे कसे मी विसरून जावू
जुन्यास माझा नकार नाही
नवे कसे मी विसरून जावू
वाट दावती जीवनभर ते
दिवे कसे मी विसरून जावू
विसरुन जाईन प्रेम जगाचे
तुझे कसे मी विसरून जावू.
Comments
Post a Comment