माफ करा

पसायदानातली वैश्विक दृष्टी व स्फुर्ती घेऊन
लिहीत आहे मी कविता खूप वर्षांपासून
पण काय कोण जाणे..
येत नाही माझ्या लेखणीला
बंगालच्या रसगुल्याची गोडी
खमण ढोकळा ही बनत नाही गुजरातचा
इडली डोसा मेदूवड्याची चव
उतरलीच नाही कधी कवितेत माझ्या
आणि ..
दिल्लीचे छोले भटुरे, बिहारचा लिट्टी चोखा
पंजाबी परोठा, राजस्थानी नमकीन
कश्मीरी पुलाव बद्दलही तेच रडगाणं
मग चायनीज-जापनीजचे नूडल्स,
युरोपियन चे पिझ्झा बर्गर तर कोसो मैल दूर
माफ करा ज्ञानेश्वरा मला
वैश्विक होऊ शकलो नाही मी.


Comments