मैफल

तीक्ष्ण स्मरणशक्तीचा माणूस
ही बिरुदावली घेऊन
मिरवत राहिलो मी जन्मभर
मानासन्मानाने
पण…
पश्र्चिम किनाऱ्यावर येता येता
काहीच आठवत नव्हतं मला गतकाळातलं
प्रेमाच्या दोन चार तेजःपुंज ठिपक्यांशिवाय
एवढा मानसन्मान पुरेसा आहे मला
संध्याकाळच्या मैफलीसाठी


Comments